सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात आज 7 जून रात्री 12 पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी पाच ते सकाळी पाच वाजेपर्यंत आणि शनिवार रविवारी पूर्ण कडक संचारबंदी लागू करण्यात आल्याचा नवा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे
अत्यावश्यक बाबींची दुकाने/ आस्थापना सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असणार आहे. मेडिकल औषधे पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी असेल. तर मॉल, सिनेमागृह पूर्ण बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट घरपोच पार्सलसाठी चालू राहतील. सार्वजनिक जागा, मैदाने, चालणे सायकल चालवण्यासाठी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 5 ते 9 या वेळेत चालू ठेवण्यास परवानगी राहील. निवडणुकांसाठी बैठका स्थानिक संस्थांच्या किंवा सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा ज्या ठिकाणी सभा होणार अशा ठिकाणच्या 50% ने सभा घेण्यास परवानगी दिली जाणार आहे.
अत्यावश्यक बाबीमध्ये किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादी सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश असणार आहे.