सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील मेणवली येथील नानासाहेब फडणवीस वाड्याच्या जीर्णोद्धाराच्या पहिल्या टप्प्याचे आणि “मी वाडा बोलतोय” या स्मार्ट ऑडिओ गाईडचे उद्घाटन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मेणवली येथे पार पडलेल्या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी नारायण घोलप, वाई पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक किरणीज मोरे, मेणवलीकर ग्रामस्थ, नानासाहेब फडणवीस यांचे वंशज अनिरूद्ध मेणवलीकर, नितीन मेणवलीकर, संदीप मेणवलीकर आणि इतर मेणवलीकर फडणीस कुटुंबीय उपस्थित होते.
गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक नवीन व्यवसाय तसेच उद्योग सुरु केले जातात. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील मेणवली येथे नानासाहेब फडणवीस वाड्याच्या जीर्णोद्धाराच्या पहिल्या टप्प्याचे आणि स्मार्ट ऑडिओ गाईडचे उद्घाटन करण्यात आले आहे.