शरद पवारांकडून राज ठाकरेंची धुलाई; म्हणाले की, त्यांच्या तोंडाला कोणीही…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर जोरदार टीका केली. त्यानंतर आता शरद पवारांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे 3-4 महिने गायब होतात अन् मग एखादे व्याख्यान देतात. अन् मग परत एकदा गायब होतात असा टोला शरद पवार यांनी लगावला. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात. मग त्यानंतर एखादं लेक्चर देतात. मग पुन्हा ३ ते ४ महिने भूमिगत होतात, अशा शब्दांत पवारांनी राज यांना टोला हाणला. राज यांच्या राजकारणाचं हेच वैशिष्ट आहे. राज यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कामाचं कौतुक केलं. राज यांना उत्तर प्रदेशात नेमकं काय दिसलं ते माहीत नाही.

योगी आदित्यनाथ यांच्या ५ वर्षांच्या राजवटीत तिथल्या प्रदेशात काय काय झालं, हे साऱ्या देशाने पाहिलं. लखीमपूर, उन्नाव, हाथरस अशा घटना सगळ्यांनी पाहिल्या. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आलं. पण मला इथं सांगायचंय की महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात असं काही होऊ देणार नाही”, असं म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंवर ‘पवार स्टाईल’ वार केला.