सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहर. महामार्ग वगळता सर्व ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळा सुरू राहणार अहेत मात्र शाळांमध्ये तपासणी पथके पाहणी करणार आहेत. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घोषणा केली आहे.
लग्न समारंभासाठी 50-50 माणसांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर देखील कारवाई करण्यात येईल असं बाळासाहेब पाटील म्हणाले. तसेच जी हॉटेल चालू आहेत त्यांनी सुद्धा रात्री अकरा पर्यंत हॉटेल बंद करावी अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. विनामास्क वावरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून या माध्यमातून कोरोना प्रधुर्भाव कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील अस बाळासाहेब पाटील यांनी म्हंटल.
जे धार्मिक कार्यक्रम आहेत किंवा लग्न समारंभ आहेत किंवा राजकीय कार्यक्रम असो अशा ठिकाणी नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून आपण गस्त पद्धत टाकून ठेवली आहे. त्याप्रकारच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत अस पालकमंत्र्यांनी सांगितलं.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा
Click Here to Join WhatsApp Group