सातारा जिल्हा नगरपंचायत निवडणुक : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला ; 31 बुथवरून मतमोजणीला सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात सध्या नगरपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा आणि दहिवडी अशा सहा नगरपंचायतीची निवडणुकीसाठी काल मंगळवारी 80.49 टक्के मतदान झाले. मतमोजणी अधिकाऱ्यांनी मतमोजणीला सुरुवात केली आहे. मत मोजणीसाठी 31 बूथवर 615 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या 23 जागांसाठी मंगळवारी शांततापूर्ण वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडली. जिल्ह्यात एकूण 31 बूथवर सुमारे 17 हजार 168 मतदारांपैकी 13 हजार 818 उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा येथील प्रत्येकी चार व दहिवडी नगरपंचायतीच्या तीन अशा 23 इतर मागास प्रवर्गाच्या जागांसाठी एकूण 82 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दरम्यान काल सहा नगरपंचायतीच्या 13 हजार 818 मतदारांनी निवडणुकीच्या रिंगणातील 82 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद केले.

कोरेगाव मध्ये आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध आमदार महेश शिंदे असा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आहे. जिल्हा प्रशासनाने 31 बूथवर 615 कर्मचारी यांची नियुक्ती केली असून नगरपंचायत कार्यक्षेत्रात मतमोजणी केली जाणार असून एक केंद्राध्यक्ष ‘ चार मतमोजणी अधिकारी तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्या नेमणुका निश्चित झाल्या असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहेत.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला –

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे यामध्ये कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. पाटण नगरपंचायती साठी राज्यमंत्री शंभूराजे देसाई तसेच माझी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक सत्यजित पाटणकर यांचे देसाई पाटणकर गट आमने- सामने आहे. पाटण येथे काही ठिकाणी तिरंगी तिरंगी चौरंगी लढत होत आहे त्यामुळे यामध्ये प्रामुख्याने देसाई की पाटणकर गट सत्ता मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment