ठरलं तर!! गोव्यात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्रच निवडणूक लढतील अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. तसेच इथून पुढे काँग्रेस सोबत युतीबाबत बोलण्यात काहीच अर्थ नाही अस म्हणत त्यांनी काँग्रेस वर आपली नाराजी व्यक्त केली.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, गेल्या 5 वर्षात 15 आमदार काँग्रेस ला सोडून गेले तरी ते स्वबळाची भाषा करतात. त्यांना वाटत की ते गोव्यात आपल्या बळावर निवडणूक जिंकू शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यात शिवसेनेसोबत युती केली असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेसच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. आपण महाराष्ट्रात एकत्र आलो म्हणून भाजपला सत्तेपासून बाहेर ठेऊ शकलो. ती मानसिकता देशभरात असायला हवी, तरच भाजपला आपण लांब ठेवू शकू. गोव्यात मात्र काँग्रेस भाजपला रस्ते मोकळे करीत आहे, असं आव्हाड यांनी म्हंटल.