सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात लोकांच्यात लसीकरणांविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरूवातील ५ ते ६ हजार लोक लसीकरण करून घेत होते. मात्र लसीकरण करणे किती गरजेचे आहे, यांची कल्पना लोकांना आली असल्याने आता दिवसाला २५ हजार डोसची आवश्यकता असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरूध्द आठल्ये यांनी सांगितले.
डाॅ. आठल्ये म्हणाले, सुरूवातीला लसीविषयी जनजागृती करावी लागत होती. १ एप्रिलला जिल्ह्यात ५ ते ६ हजार लसीकरण होत होते. आता जवळपास दिवसाला २५ हजार लसीकरणांचे डोस दिले जात आहेत. त्यामुळे लसीचा साठा संपुष्टात आलेला आहे.
जिल्ह्यात 446 केंद्रावर लसीकरण चालू केले आहे. जिल्ह्याला ३ लाख २ हजार डोस आलेले होते, त्यापैकी २ लाख ९० हजार डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लोकांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे. यापुढील काळात लसीकरण आणखी चांगल्या प्रकारे राबविण्यात येणार असल्याचे डाॅ. आठल्ये यांनी सांगितले.