‘व्हाईस ऑफ मीडिया’ देणार ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ : जिल्हाध्यक्ष विशाल पाटील

0
127
Vice of Media Positive Journalism Award Vishal Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची निर्मिती झाली आहे. जी संघटना सध्या देशात तेवीस राज्यांत कार्यरत आहे. ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ अजून रुजावे, या उद्देशाने या वर्षीपासून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड सुरू केला आहे. या स्पर्धेत रोख अडीच लाख रुपयांचे चार पुरस्कार, विशेष पाच पुरस्कार, सर्व सहभागी स्पर्धक पत्रकारांना प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याची माहिती ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे जिल्हाध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली.

‘व्हाईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा माने, शेट ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशीष ब्रिजमोहन लढ्ढा, यांनी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३ ची घोषणा केली आहे.

‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३ प्रथम क्रमांक १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान. द्वितीय क्रमांक ६१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान. महिला पत्रकार ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ,मानपत्र, सन्मान. तृतीय क्रमांक ४१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान. सहभागींना उत्तेजनार्थ पाच विशेष पुरस्कार. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सहभागी होणारे पत्रकार त्या दैनिक, साप्ताहिकाचे प्रतिनिधी आवश्यक आहेत. प्रस्ताव देताना संपादकांचे पत्र जोडणे आवश्यक आहे. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक असणाऱ्या बातम्या, लेख यास्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील. जानेवारी २०२४ मध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत विजेत्यांना दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा महाराष्ट्र, मराठी भाषेपुरतीच आहे. ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे वरिष्ठ व मुख्य पदाधिकारी मंदार फणसे,संजय आवटे, धर्मेंद्र जोरे, अनिल मस्के, विलास बडे, सुधीर चेके पाटील, बालाजी मारगुडे हे निवड प्रक्रियेचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ कोकण विभागीय कार्यालय एल.३०-१२०१- स्वप्नपूर्ती , सेक्टर ३६ खारघर, नवी मुंबई ४१०२१० या पत्त्यावर प्रस्ताव पाठवायचे आहेत. ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे सर्व ठिकाणीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव या प्रमुख चार जणांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही.

शेट ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठान चिखलीचे अध्यक्ष आशीष ब्रिजमोहन लढ्ढा यांच्या सहकार्याने हा पुरस्कार उपक्रम पार पडतोय. आशीष ब्रिजमोहन लढ्ढा म्हणाले, या सामाजिक उपक्रमात मला सहभागी होता आले, हे मी माझे भाग्य समजतोय, हा उपक्रम नक्कीच समाजासाठी प्रेरक ठरेल. या स्पर्धेत राज्यातल्या सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे , असे आवहान जिल्हाध्यक्ष विशाल पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी www.voiceofmedia.org ला भेट द्या.