सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली पहिली ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 833 शाळा आणि महाविद्यालयांची घंटा आजपासून पुन्हा एकदा वाचणार आहे. शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
राज्य सरकाच्यावतीने सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा नितीन नुकताच घेण्यात आला. त्यानुसार आजपासून शाळांना सुरुवात होत आहे. सातारा जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 833 शाळा आणि महाविद्यालयांना आजपासून सुरुवात होणार असल्याने शिक्षण विभागाच्यावतीने तशी तयारीही करण्यात आली आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळांना सुरुवात होत असल्याने काही ठिकाणी शिक्षकांना ऑनलाईन शिकवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात यावे अशी मागणी पालकांमधून होत होती. ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त नाही अशा भागातील शाळा सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. त्यानुसार आजपासून शाळांना सुरुवात करण्यात अली आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्यातील 2 हजार 691 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच 1 जार 142 इतर सर्व नगर पालिका आणि खासगी शाळा अशा आहेत. अशा जिल्यातील एकूण 3 हजार 833 शाळा आणि महाविद्यालयांची घंटा आज वाजणार आहे.