सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज दिवसभरात बुधवारी दि. 9 जून संध्याकाळपर्यंत 2006 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. तर काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 872 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 28 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात
जावली 20 (7952), कराड 169 (23990), खंडाळा 46 (11076), खटाव 130 (17624), कोरेगांव 76 (15403), माण 82 (12126), महाबळेश्वर 6 (4140), पाटण 46 (7487), फलटण 64 (27275), सातारा 195 (37171), वाई 24 (12012) व इतर 15 (1141) असे आज अखेर एकूण 177397 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात
जावली 1 (182), कराड 4 (689), खंडाळा 1 (142), खटाव 3 (437), कोरेगांव 4 (343), माण 3 (236), महाबळेश्वर 0(44), पाटण 1 (163), फलटण 2 (266), सातारा 9 (1123), वाई 0 (315) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 940 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.