सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर 16 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. परंतु या म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर हा 50 टक्केपेक्षा जास्त असतो, त्यामुळे हा कमी असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. परंतु हा मृत्युदर जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू दराच्या सातपट जास्त असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढु लागली आहे.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 122 जणांना म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. त्यातील 68 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत 19 जणांचा या म्युकरमायकोसिस मुळे मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर 15.57 टक्के असून, तो कोरोना बाधितांच्या मृत्यूदरापेक्षा 6.95 टक्के म्हणजेच सुमारे सातपट अधिक आहे. सातारा जिल्ह्यात म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीची लागण झालेले रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
ज्या लोकांना कोरोना झाला असून त्यांनी जास्त दिवस उपचार घेताल आहे. तसेच ज्याच्यामध्ये जास्त मधुमेह, किडनी किंवा लिव्हर ट्रान्सफर्नट, ड्रग घेतात ते रूग्ण हायरिस्क असतात. म्युकरमायकोसिसची इंजेक्शन उपलब्धता संचालक व उपसंचालक करून देतात. कृष्णा हाॅस्पिटल तसेच काही खासगी दवाखान्यातही इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहीती डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.