अखेर सातारा-कागल सहापदरीला मुहूर्त मिळाला; नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : हॅलो महाराष्ट्र – पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते सातारा (satara kagal expressway) या 127 किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या मार्गावर 11 ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, दोन कंपन्यांना बीओटी तत्त्वावर हे सहापदरीकरणाचे काम देण्यात आले आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम रखडले होते. अखेर या कामाला मुहूर्त मिळाला असून या महिन्याच्या शेवटी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

या ठिकाणी होणार उड्डाणपूल
या मार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामादरम्यान नागाव फाटा, लक्ष्मी टेकडी, अंबप फाटा, कणेगाव, येलूर फाटा, वाघवाडी, नेर्ले, शेणे-येवलेवाडी, कराड-मलकापूर, मसूर फाटा, नागठाणे या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. सांगली फाटा येथे महामार्गाची उंची वाढवण्यात येणार आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग (satara kagal expressway) प्राधिकरणाच्या वरिष्ठ कार्यालयातर्फे ठेकेदाराच्या वित्तीय परिस्थितीची चौकशी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला वर्क ऑर्डर देऊन काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदाराला नोव्हेंबर 2025 अखेरीस हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

या महामार्गाबद्दल काही महत्वाचे मुद्दे
1) सातारा-कागल या महामार्गाचे (satara kagal expressway) सहापदरीचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त मिळाला आहे. या कामासाठी दोन टप्प्यांत निविदा काढण्यात आली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.
2) कागल ते पेठ नाका या 63 कि.मी. अंतरासाठी 1 हजार 491 कोटी रुपयांची निविदा होती. मात्र, ठेकेदाराने 30 टक्के कमी दराने निविदा भरल्याने 1 हजार 25 कोटी 20 लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे.
3) सातारा ते पेठ नाका या 67 कि.मी. अंतरासाठी 1 हजार 749 कोटी 86 लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. मात्र, 15 टक्के प्रीमियमने ठेकेदारांची निविदा मंजूर करण्यात आली आहे.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?