सातारा | गेल्या दहा वर्षांपासून पोलिसांना विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीस सातारा पोलिस दलाच्या स्थानिक गु्न्हे शाखेस अटक करण्यात यश आले आहे. संशयित आरोपीचे नाव संजय नमण्या पवार असे असून, त्याच्यावर एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. तसेच पाच गंभीर गुन्ह्यात तो गेल्या 10 वर्षांपासून फरार होता.
संजय नमण्या पवार हा (रा. सासवड- झणझणे, ता. फलटण) येथील माळीबेन वस्ती वडाचा मळा येथे असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या अंमलदार आणि पाेलीसांवर त्याने दगडफेक करुन तलावर व काेयत्याने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला हाेता. त्याबाबत त्याच्या खुनाचा गुन्हा नाेंदविण्यात आला हाेता. त्यानंतरही त्याने सातारा जिल्ह्यात विविध गुन्हे केले हाेते. त्याच्यावर 2012 पासून जिल्ह्यातील लाेणंद, खंडाळा, फलटण ग्रामीण आदी ठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न, दराेडा असे विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल हाेते.
सातारा पाेलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेस संजय नमण्या पवार यास भुरकरवाडी गावाच्या परिसरात शस्त्रांसह असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, आज पाेलीसांनी घटनास्थळी जाऊन त्यास सापळा लावूऩ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने एलसीबीच्या पथकावर हल्ला चढविला. पाेलीसांनी त्यांच्या जीवाची परवा न करता त्यास अत्यंत शिताफीने पकडले. त्याच्यावर या हल्ला संदर्भात लाेणंद पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
कारवाई एलसीबीच्या पथकाने पाेलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अतिरिक्त पाेलीस अधीक्षक अजित बाे-हाडे यांच्या सूचनेनूसार पाेलीस निरीक्षक किशाेर धुमाळ, सहायक पाेलीस निरीक्षक रमेश गर्जे, पाेलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पाेलीस हवालदार उत्तम दबडे, तानाजी माने, विश्वनाथ संकपाळ, संताेष पवार, अतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, संताेष सपकाळ, कांतीलाल नवघने, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडीक, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, गणेश कापरे, शिवाजी भिसे, अमाेल माने, वैभव सावंत, विशाल पवार, राेहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, गणेश कचरे यांनी केली.