साताऱ्यामधील जुन्या एमआयडीसीमध्ये दोन कंपन्या आगीत भस्मसात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा येथील जुन्या एमआयडीसीतील दोन कंपन्यांना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून अँटिक ट्रान्सपोर्ट अँड प्रा.लि या कंपनी बरोबरच लगत असलेल्या कंपनीचे ही आगीत सुमारे २० लाखाच्यावर नुकसान झाले आहे. कंपन्यात तेलाचे डबे, मशिनरी आदी साहित्य जळाले आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब, रहिमतपूर पालिका,कूपर कारखाना, अजिंक्यतारा कारखाना यांचे बंब आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत होते.आगीतील नुकसानीचा एकूण आकडा अद्यापही समजू शकला नाही. आग भीषण असली तरी आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामा करणं सुरु आहे.

Leave a Comment