कोणत्याही परिस्थितीत 19 फेब्रुवारीला किल्ले अजिंक्यताऱ्यावर होणारी शिवगाण स्पर्धा होणारच – उदयनराजे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा | कोणत्याही परिस्थितीत 19 फेब्रुवारीला किल्ले अजिंक्यताऱ्यावर होणारी शिवगाण स्पर्धा होणारच असल्याचे साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.जिल्हा प्रशासनाने या स्पर्धेवर निर्बंध घातल्या बाबत खा.उदयनराजे भोसले यांना विचारल्यानंतर त्यांनी ही स्पर्धा सोशल डिस्टन्स पळून केली जाईल आणि या कार्यक्रमाला मी देखील येणार असून नाही आलो तर लोक माझा कडेलोट करतील अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी केली आहे…

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काही निर्बंध घातले आहेत हे सुद्धा खर आहे. सोशल डिस्टन्सच पालन केलंच पाहिजे. पण अशा प्रकारचे कार्यक्रम सुद्धा झाले पाहिजेत. अशा कार्यक्रमातुनच भावी पिढीला प्रोत्साहन मिळतं. आपल्यालाच जर आपल्या संस्कृतीचा विसर पडला तर मग तुमची आमची ओळख तरी काय असा सवाल उदयनराजेंनी केला.

हा सांस्कृतिक कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे आवाहनही त्यांनी मीडियाला केलं.यावेळी एका पत्रकाराने खा.उदयनराजे भोसले यांना आपण पांढरा शर्ट न घालता रंगीत शर्ट घातला आहे व्हॅलेंटाईन साठी स्पेशल आहे का असा प्रश्न विचारला त्याला उत्तर देताना हो स्पेशल आहे आणि तुम्ही म्हातारे झाला आहात मी नाही असं उत्तर दिले यानंतर सर्वानाच हसू आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like