शिवजयंती नक्कीच साजरी झाली पाहिजे परंतु त्याच बरोबर लोकांनी काळजी सुद्धा केली पाहिजे – उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शिवजयंती साजरी करण्याबाबत निर्बन्ध आणले आहेत. याच मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप आणि मनसेने सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. दरम्यान याबद्दल भाजप नेते आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना विचारल असता त्यांनी आपली रोखठोख भूमिका मांडली.

खा.उदयनराजे म्हणाले कोरोनाच्या महामारी मध्ये अनेकांनी जवळची लोकं गमावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहेत आणि त्यांची जयंती ही झालीच पाहिजे परंतु त्याच बरोबर आपल्या लोकांची काळजी घेणे ही आपली आणि शासनाची अशी सर्वांचीच जवाबदारी आहे.शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी सुद्धा असाच विचार केला असता त्यांनी लोकांना नेहमी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्यामुळे शिवजयंती साजरी जरूर करा पण स्वतःची सुद्धा काळजी घ्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्ली मध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट त्यांनी घेतली होती याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले की मला खात्री आहे की चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment