Satara News : पुणे अन् सातार्‍यात दहशत माजवणार्‍या 7 जणांवर मोक्का; उब्रज पोलिस‍ांची मोठी कारवाई

Satara News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी (Satara News) : उंब्रज पोलीस ठाणे अंतर्गत विविध दाखल गुन्ह्यातील टोळीप्रमुख मयूर महादेव साळुंखे राहणार कालगाव व त्यांचे टोळी सदस्य पंकज अमृत यादव (भवानवाडी), शाहरुख रफिक मुल्ला (मसूर), सुरज सूर्यकांत जाधव (वाघेश्वर, अमोल बाजीराव जाधव (वाघेश्वर), अक्षय अनिल कोरे (ब्रह्मपुरी मसूर), प्रकाश आनंदराव यादव (ब्रह्मपुरी मसूर) यांच्याविरुद्ध सातारा व पुणे जिल्ह्यांत विविध गुन्हे नोंद आहेत.

गावातील यात्रेच्या तमाशा कार्यक्रमात फोडायला गेले नारळ अन् झाला राडा

सातारा जिल्ह्यातील उंब्रज व कराड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील निगडी व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खून, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, अपहरण, आर्म ऍक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

फक्त 2 मिनिटांत तुमची जमीन मोजा, तेही अगदी फुकट; आजच ‘या’ सोयीचा लाभ घ्या

टोळीप्रमुख मयूर साळुंखे याने त्याच्या टोळीची दहशत पसरवण्यासाठी उंब्रज परिसरातील इतर गुन्हेगारांना एकत्र करून दहशत पसरवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी या टोळी विरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करून आरोपींच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाईकरता पोलीस अधीक्षक सातारा यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोका अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. नमूद प्रस्तावाला सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांनी मंजुरी दिली आहे. (Satara News)

Yamaha RX 100 : फक्त 60 हजार रुपयांना इथे मिळतेय बेस्ट बाईक; आजच करा बूक..

नमूद गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे लावून या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी रंणजीत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. नोव्हेंबर 2022 पासून सहा मोक्का प्रस्तावांमध्ये 99 इसमांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच 16 इसमांविरुद्ध हद्दपारसारखी कारवाई करण्यात आली आहे.

यापुढेही अशाच कारवाया करण्यात येणार आहेत. मोक्का प्रस्ताव मंजुरी करता पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस नाईक अमित सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संजय देवकुळे, श्रीधर माने यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.