हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Satara News) | सातारा शहरात हादरून टाकणारी घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सातारा रस्त्यावरील डी मार्ट शेजारच्या इंद्रनिल सोसायटीतील इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सच्या दुकानांत स्फोटामुळे भिषण आग लागली. यामध्ये चार दुकाने जळून खाक झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा रस्त्यावर इंद्रनिल सोसायटीतील इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सच्या दुकानांत एकापाठोपाठ एक असे तीन स्फोट झाले. या स्फोटांच्या आवाजाने सर्व परिसर दणाणून गेला. मध्य रात्री दोन वाजण्याच्या सुमारास नागरिक घाबरून घरातून बाहेर पडले. तर रस्त्यावरील वाहतूक थांबली. या दुर्घटनेत वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी सदैवाने रात्रीची वेळ असल्याने जिवीत हानी आणि मोठी अनर्थ टळला.
स्फोटाची तिव्रता इतकी प्रंचड होती की, त्या धक्क्याने दोन मजली इमारतीची पडझड झाली. दुकानांचे शटर तुटून पडले, भिंती पडल्या, दगड, विटा व इतर साहित्य मुख्य रस्त्यावर विखरून पडले. दुकानाच्या काउंटर, शोकेस व केबिनच्या काचा फुटून तब्बल चाळीस फुट बीआरटी मार्गा पर्यंत जाऊन पडल्या, रस्त्यावर काचांचा खच पडला. काचेचे तुकडे उडाल्याने पादाचारी जखमी झाला. आगीमुळे एक दुचाकी पूर्ण जळून खाक झाली. (Satara News)
दरम्यान आगीची माहिती मिळताच कात्रज, कोंढवा आणि सिंहगड रोड अग्निशमन केंद्राच्या मिळून ०६ फायरगाड्या ०२ वॉटर टँकर व ०१ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आठ गाड्यांनी आग आटोक्यात आणली.