सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललेला आहे. गुरुवारी (दि २५) चालू वर्षातील कोरणा बाधित आजचा आकडा उंच्चाक गाठलेला पाहायला मिळाला. एका दिवसात तब्बल एका दिवसात ४९५ जण बाधित आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात काही प्रमाणात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र मार्च महिन्यात हे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात १३३,१५९,२९३,३७१ तर गुरूवारी ४९५ असा बाधितांचा आकडा वाढतच चाललेला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा ६३७४२ आकडा झाला. तर जिल्ह्यात एकूण ५८७०५ बरे झालेली रुग्णसंख्या आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १८९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या जिल्ह्यात २८६७ उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत. जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाने लावलेले निर्बंध व त्यावरील कारवाई कोठेच होताना दिसत नाही . त्यामुळे दिवसेंदिवस कोरणा बाधित यांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक असताना, लोकांच्यात कोणतेही गांभीर्य दिसत नाही. तसेच प्रशासनाचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा