पोलिस ठाण्यात पोलिसाचा धिंगाणा : घरगुती वादातून पत्नीसह नातेवाईकांना मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा पोलीसाने पोलिस ठाण्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिस असलेला पती मारहाण करत असल्याने पत्नी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्यानंतर शिवीगाळ करत मारहाण केल्याचे उपस्थित नातेवाईंकांनी म्हटले आहे. अनिल वसंत स्वामी असे पोलिस ठाण्यात गोंधळ घालण्याऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा पोलिस ठाण्यातील कर्मचारी अनिल स्वामी आणि त्याच्या पत्नीच्यात गेल्या काही दिवसापासून सतत भांडणे होत आहेत. आज पत्नी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा पती अनिल स्वामी यांनी शिवीगाळ करत गोंधळ निर्माण केला. यावेळी उपस्थितांनी सदरचा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/5272173226182884

या घटनेने पोलीस स्टेशन आवारात काहीकाळ गोंधळ उडाला. नशेत असलेला पोलीस कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला उपस्थित लोकांकडून आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने शिवीगाळ करणे सुरूच ठेवलं. पत्नीने संसार करण्यास नकार दिल्याने मुलांना माझ्याकडे दे या मागणीसाठी त्याने हा गोंधळ घातला. पोलीस पतीविरोधात तक्रार देण्यासाठी पत्नी पोलीस स्टेशनला आली असता हा गोंधळ उडाला.