Sunday, May 28, 2023

राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीवर बृजभूषण सिहांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा बहुचर्चित असा असलेला ५ जून रोजीचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राज ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केला असला तरी मी मात्र अयोध्याला जाणार आहे. आता प्रकरण बदललेले आहे. तरीही आम्ही मात्र त्या ठिकाणी जाणार असून आमचा कार्यक्रम ठरलेला आहे. तेथे जाऊन आता योगींचा वाढदिवस साजरा करणारच, असे बृजभूषण सिहांनी म्हंटले आहे.

गोंडा येथे दौऱ्यावेळी खासदार बृजभूषण सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी मोठ्या उत्साहाने अयोध्याचा दौरा करणार असे सांगितले होते. त्याची जय्यत तयारीही केले होती. मात्र, आता त्यांनी अचानकपणे आपला दौरा तूर्तास स्थगित करत असल्याचे सांगितले. आता ते जरी अयोध्याला येणार नसले तरी मी मात्र जाणार आहे. आमचा जो काही कार्यक्रम ठरलेला आहे. तो आम्ही करणारच आहोत. आता प्रकरण मात्र बदललेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण धार्मिक विधिद्वारे योगीजींचा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत, असे सिह यांनी म्हंटले.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनीही कडाडून विरोध केला होता. आणता त्यांच्या दौरा स्थगितीनंतरही त्यांनी आपला विरोध करायण ठरवला असल्याचे सांगितले आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला होता. यासाठी ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. त्यामुळे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा खडतर मानला जात होता.