सातारा | सातारा शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी करणे, घरफोडी, खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल असलेला प्रमोद ऊर्फ बाळा काशीनाथ सगट (रा. प्रतापसिंहनगर, खेड, सातारा) याचेवर 5 गुन्हे दाखल होते. सदरील आरोपी हा वारंवार गुन्हे करीत असलेने त्यास सातारा जिल्ह्यातुन हद्दपार करणेबाबतचा प्रस्तावावर उपविभागीय दंडाधिकारी सातारा यांनी कारवाई केलेली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पोलीस अधीक्षक सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्याकडून उपविभागीय दंडाधिकारी सातारा यांना पाठविला होता. प्रस्तावातील प्रमोद ऊर्फ बाळा काशीनाथ सगट (रा. प्रतापसिंहनगर, खेड) यास संपुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन 2 वर्षे कालावधीकरीता तडीपार केले आहे. तसेच सातारा शहर पोलीस स्टेशन कडुन १) आमीर इम्तीयाज मुजावर (रा. पिरवाडी सातारा), २ ) आमिर सलीम शेख (रा. वनवासवाडी सातारा), ३) प्रल्हाद रमेश पवार (रा. केसरकर पेठ सातारा), ४) जिवन शहाजी रावते (रा. दत्तनगर कोडोली सातारा), ५) अभिजीत अशोक भिसे (रा. दत्तनगर कोडोली सातारा), ६) विकास मुरलीधर मुळे (रा. पॉवर हाऊस झोपडपट्टी सातारा), ७) जगदीश रामेश्वर मते (रा. रांगोळे कॉलनी शाहुपूरी सातारा), ८) सौरभ संजय जाधव (रा. मोळाचा ओढा सातारा), ९) अभिजीत राजु भिसे (रा. मोळाचा ओढा सातारा), १० ) आकाश हणमंत (रा. सैदापुर ता. जि. सातारा) यांनाही यापुर्वी तडीपार करण्यात आले आहे.
वरील तडीपार गुंड आपणास दिसून आलेस आपण सातारा शहर पोलीस स्टेशन फोन नं. 02164-230580 यावर माहीती दयावी. आपली नाव व देण्यात आलेली माहिती गोपनीय ठेवणेत येईल. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजय बो-हाडे, सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस स्टेशन डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पोना सुजित भोसले, गणेश ताटे, राजु कांबळे, अविनाश चव्हाण, जोतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, पोशि विशाल धुमाळ, संतोष कचरे, सागर गायकवाड यांनी सहभाग घेतला.