सातारा पोलिसांचा अवैध धंद्यावर एकाच दिवसात हातोडा : जिल्ह्यात 27 गुन्हे दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
नव्यानेच आलेले सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत असून एका दिवसात 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सातारा शहर पोलीस ठाणे 12 व शाहुपूरी पोलीस ठाणे 8 असे एकुण 20 गुन्हे दाखल झाले आहेत. दि. 31/10/2022 रोजी अवैध जुगार धंद्यांवर छापे टाकुन पोलिसांनी जुगार कायद्यान्वये दाखल करणेत आलेले आहेत. अवैध जुगार धंद्यांवर संयुक्तरित्या करण्यात आलेल्या कारवाईत एकुण 20 गुन्हयांमध्ये 56 आरोपींचेवर कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात एकूण 1 लाख 61 हजार 593/- रुपयांचे अवैध जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.

तसेच अवैध दारु धंद्यांवर छापे टाकुन दारुबंदी कायद्यान्वये सातारा तालुका पोलीस ठाणे- 1, औंध पोलीस ठाणे-1, वडुज पोलीस ठाणे – 4 बोरगाव पोलीस ठाणे 1 असे एकुण 7 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अवैध दारु धंद्यांवर संयुक्तरित्या करण्यात आलेल्या कारवाईत 7 गुन्हयांमध्ये एकुण 8 आरोपींचेवर कारवाई करुन त्यांचेकडून एकुण 7,470/ रुपयांचा अवैध दारुसाठा जप्त करणेत आलेला आहे.