Unity Small Finance Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! स्पेशल FD वर मिळेल 8.3% व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Unity Small Finance Bank: RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Unity Small Finance Bank ने देखील एक स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स लॉन्च केली आहे. या ऑफरमध्ये बँकेकडून FD वर वार्षिक 8.3% दराने रिटर्न मिळेल. मात्र हा व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल. त्याच वेळी, सामान्य ठेवीदार किंवा रिटेल ग्राहकांसाठी हा दर 7.8% इतका ठेवण्यात आला आहे.

Chetna Sarmandal - Branch Banking Maker - Unity Small Finance Bank | LinkedIn

हे लक्षात घ्या कि, या आकर्षक व्याजदराचा लाभ घेण्यासाठी ‘Shagun 366’ ऑफर अंतर्गत 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेमध्ये FD उघडता येईल. Unity Small Finance Bank ची मर्यादित कालावधीची ऑफर आहे जी 1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असेल.

1 वर्ष 1 दिवसाच्या या स्पेशल FD योजनेवर सर्वसामान्य नागरिकांना 7.80% तर ज्येष्ठ नागरिकांना 8.30% दराने व्याज मिळेल. Unity Small Finance Bank ने कॉलेबल आणि नॉन-कॉलेबल बल्क डिपॉझिटवर (2 कोटी रुपयांपेक्षा जास्त) व्याजदरातही वाढ केली आहे. कॉलेबल बल्क डिपॉझिट्सवर वार्षिक 7.75% पर्यंत व्याज देतात. तर नॉन-कॉलेबल बल्क डिपॉझिटमध्ये वार्षिक 7.85% पर्यंत व्याज मिळेल.

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

Unity Small Finance Bank नवीन व्याज दर

7-14 दिवस – 4.50%
15-45 दिवस – 4.75%
46-60दिवस – 5.25 %
61-90 दिवस – 5.50%
91-180 दिवस – 5.75%
181 – 364 दिवस – 6.75%
365 दिवस (1 वर्ष) – ७.३५%
1 वर्ष 1 दिवस – 7.80%
1 वर्ष 1 दिवस – 500 दिवस – 7.35%
501 दिवस – 7.35%
502 दिवस ते 18 महिने – 7.35%
18 महिने ते 2 वर्षे – 7.40%
2 वर्षे ते 3 वर्षे – 7.65%
3 वर्षे ते 5 वर्षे – 7.65%
5 वर्षे ते 10 वर्षे – 7.00%

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://theunitybank.com/

हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा