सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
दहीवडी तहसिल कार्यालय तसेच कोल्हापुर येथे शासकीय नोकरी लावतो, असे सांगून सातारा, सांगली, पुणे जिल्हयातील एकुण 18 लोकांकडून 15 लाखाची रक्कम घेवुन फसवणुक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबट पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रमेश पोपट ढावरे (रा. नरुटवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मारुती जयवंत साळुखे, (रा.नरोटवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे मुळ रा. बनपुरी, ता. आटपाडी, जि. सांगली) व प्रविण राजाराम येवले (रा येवले, रा. वडी, ता. खटाव, जि. सातारा) यांनी दहीवडी तहसिल कार्यालय किंवा कोल्हापुर येथे शासकीय नोकरी लावतो असे सांगितले. तसेच वेळोवेळी २० हजार रुपये घेतले. याबाबत नंतर विचारांनी केली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश ढावरे यांनी दोन आरोपींविरोधात सातारा शहर पोलिसात तक्रार दिली.
त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला. पोलिसांनी आरोपीच्याकडे अधिक चौकशी केली. चौकशी अंती सातारा, सांगली, पुणे जिल्हयातील एकुण 18 लोकांकडून सरकारी नोकरी लावतो असे सांगुन त्याची 15 लाखाची फसवणुक केली आहे, अशी माहिती आरोपींनी दिली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक सहा. पोलीस अधीक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भोसले,पोलीस नाईक पंकज मोहिते, पोवीस कॉन्स्टेबल निलेश निकम यांनी केली आहे.