सातारा पोलिसांची कामगिरी : महाराष्ट्रासह गुजरातमध्ये व्यावसायिकांना फसविणारे दोघे जेरबंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

ट्रक चालविण्यास दिल्यानंतर फसवणूक करणाऱ्या दोघांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहने चालविण्यास घेवून परस्पर विक्री करणाऱ्या दोघांनी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही ट्रक व्यवसायिक, ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांना फसविललेले असल्याची माहिती समोर आलेली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाणेचे हददीमधील इंडो स्टार कॅपिटल फायनान्स शाखा सातारा येथून सचिन बजरंग चव्हाण (रा. एकंबे ता. कोरेगाव जि. सातारा) यांनी एक दहा टायरी ट्रक फायनान्सकडून कर्जाने घेतला होता. सदर ट्रकचे हप्ते थकित राहिलेने फायनान्स कंपनीचे एजंटचे ओळखीने सदर ट्रक हा उन्मेश उल्हास शिर्क (रा. निरा ता. पुरंदर जि. सातारा) यास थकित हप्ते भरून ठराविक रक्कम देवून ट्रक चालविण्यास दिला होता. सदर ट्रकचे हप्ते थकित राहू लागल्याने सदर ट्रक मालकाने संबंधितास हप्ते भरण्याबाबत सांगितले. परंतू त्यास वारंवार टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे येवू लागल्याने तसेच पैसे भरत नाही व ट्रक देखील देत नाही. अशी दमबाजी करू लागल्याने आपली फसवणूक झालेबाबत फिर्यादी यांना समजले. त्याबाबत त्यांनी व्यवसायिकांकडून अधिक माहिती घेतली असता संबंधित व्यक्तीने अशाच प्रकारे बऱ्याच लोकांची फसवणूक केल्याचे खात्रीशीर समजलेवर फिर्यादी यांनी सातारा शहर पोलीस ठाणेत उन्मेश उल्हास शिर्क (रा. निरा) याचे विरुद्ध तक्रार दिली.

सदर फिर्यादीवरून प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने व सामान्य नागरिकांची याप्रकारे मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आल्याने पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजय बो-हाडे, सहा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी सातारा शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्याने सातारा शहर पोलीस ठाणेचे डी. बी. पथकातील पो. उपनिरीक्षक समीर कदम यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्याप्रमाणे डी. बी. पथकाने संबंधित संशयित आरोपीची तात्काळ माहिती प्राप्त करून एकास मुंबई व एकास पुणे येथून थरारकरित्या पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांचेकडे प्राथमिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली की, सदर दोन संशयित आरोपींनी सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, अहमदनगर, गुजरात अशा विविध भागातून अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे दिसून आले. याबाबात आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सदरची वाहने परस्पर विक्री केल्याचे समजून येत आहे. त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून अधिक तपास सुरू आहे.

तरी सातारा जिल्हा तसेच इतर जिल्हयातील नागरिकांना व ट्रक व्यवसायिक, ट्रान्सपोर्ट व्यवसायिक यांना आवाहन करण्यात येते की, वरीलप्रमाणे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सातारा शहर पोलीस ठाणेस संपर्क साधावा. सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, पो.कॉ. गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, गणेश भोंग यांनी केलेली आहे.

Leave a Comment