सातारा जिल्ह्यात दिवसभरात ४० नवे कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ६८९ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात बुधवारी सकाळी २० आणि रात्री २० असे एकुण ४० नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांचा आकडा आता ६८९ वर पोहोचला आहे. अशी माहीती जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. सद्यस्थितीत जिल्हयात 241 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात जिल्ह्यात 18 जण कोरोना मुक्त झाले आहेत. जिल्हयात आतापर्यन्त 419 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 20 जणांचे रिपोर्ट बुधवारी रात्री उशिराने पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 25 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 29 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील भणंग येथील 21 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय महिला, धोंडेवाडी येथील 63 पुरुष, 57 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील पिंपळवाडी धावडशी येथील 15 वर्षीय मुलगी व 12 वर्षीय मुलगा, शाहुपुरी सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील 27, 29 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, पाचवड येथील 39 वर्षीय महिला व 13 व 16 वर्षाच्या मुली, वेळे येथील 59 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील गोंदवले ब्रुद्रुक येथील 63 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील मासूरने येथील 24 वर्षीय पुरुष व गुरसाळे येथील 39 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्हयात एकुण 28 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यु झाला आहे. पुणे, मुंबई या शहरांतून प्रवास करुन आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईनमध्ये राहून नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Leave a Comment