सातारा जिल्हा हादरला; एकाच दिवसात सापडले तब्बल ४० नवीन कोरोनाग्रस्त

0
34
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील 40 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यातला एक लोधवडे ( ता. माण ) येथील मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह निघाला आहे तर एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 40 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सातारा जिल्हा हादरला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २४१ वर पोहोचली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबई येथून आलेला कराड तालुक्यातील बाचोली येथील 47 वर्षीय पुरुष, जळगाव येथून आलेला उंब्रज येथील 58 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला गवेवाडी ता. पाटण येथील 27 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय युवक, मुंबई येथून प्रवास करुन आलेला बहुलेकरवाडी ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली कोरेगाव येथील 40 वर्षीय महिला, शिरताव ता. माण येथील 25 वर्षीय पुरुष, लोधवडे ता. माण येथील 67 वर्षीय पुरुष (मृत), शिरताव ता. माण येथील 28 वर्षीय पुरुष, कोळकी ता. फलटण येथील निकट सहवासित 34 व 60 वर्षीय महिला, 9 वर्षाचे दोन बालके, जकातवाडी ता. सातारा येथील 27 वर्षीय पुरुष, शाहुपूरी ता. सातारा येथील 29 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, धनवडेवाडी ता. सातारा येथील निकट सहावासित 36 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, घारदरे ता. खंडाळा येथील 51 वर्षीय पुरुष, येळेवाडी ता. खंडाळा येथील 70 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला वासोली ता. वाई येथील 47 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला पिंपोडे ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली पारगाव खंडाळा येथील 44 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली ता. कराड येथील 37 वर्षीय महिला, पाटण येथील निकट सहवासित 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 10 व 8 वर्षांचे बालक, 46 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 44 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, 19 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, असे एकूण 40 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मलकापूर ता. कराड येथील 49 वर्षीय पुरुष पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 241 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 121 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here