Tuesday, February 7, 2023

सोलापूरमध्ये आज पुन्हा 32 नवीन कोरोनाग्रस्त; जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 548 वर

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काल एकाच दिवशी सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर काल शुक्रवारी सायंकाळी पाच ते आज शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल 32 नविन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सोलापुरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 548 झाली आहे.

आज सकाळी आठ वाजेपर्यंत नव्याने आढळलेल्या 32 कोरोना बाधित रुग्णांमध्ये 21 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे.  आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 135 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 103 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 32 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आत्तापर्यंत पाच हजार 329 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यातील चार हजार 781 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, कोरोना मुळे आत्तापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असून 224 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. सोलापूर शहर आणि परिसरात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आणि कोरोना मुळे मृत पावणार्‍या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सोलापूरकर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Solapur