सातारा जिल्ह्याला कोरोनाचा पुन्हा धक्का! शनिवारी दिवसभरात सापडले ४७ नवीन रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी शनिवारी रात्री दिली. सकाळी सापडलेले २८ कोरोनाग्रस्त मिळून सजाणीवरी जिल्ह्यात एकूण ४७ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

रात्री उशिराने सापडलेल्या कोरोनाबाधित 19 रुग्णांमध्ये 13 पुरुष व 6 महिलांचा समावेश असून यात मुंबई येथून प्रवास करुन आलेले 12 प्रवासी, 7 निकटसहवासित आहेत. बाधित रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील जखीणवाडी येथील 47 वर्षीय महिला, 23 वर्षीय युवती, 52 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय युवक, लटकेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय युवक आणि 42 वर्षीय महिला व 21 वर्षीय युवती, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, खंडोबानगर (मलकापूर) येथील 8 वर्षीय बालक, वय 30 व 50 वर्षीय पुरुष आणि वय 45 व 30 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील नवसरे येथील 42 वर्षीय पुरुष, गमेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील खटाव येथील येथील 62 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील म्हसवड येथील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्याला कोरोनाचा पुन्हा मोठा धक्का बसला आहे. आज दिवसभरात 47 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. सातारा जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या 938 वर पोहोचली असून आजपर्यंत एकुण 711 जण कोरोनमुक्त झाले आहेत. तर आजपर्यंत एकुण 42 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत १९० कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत.

Leave a Comment