सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
नाशिक या ठिकाणी खाजगी बसने पेठ घेतल्यानंतर 11 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, ही घटना ताजी असतानाच पुणे येथे खाजगी बसनेही पेठ घेतला आहे. सुदैवाने पुण्यातील दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. याच पार्श्वभूमीवर सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अलर्ट झाले आहे. यामध्ये आरटीओ सातारा यांनी 27 खाजगी बसेस वर कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक नियम धाब्यावर बसणाऱ्या खाजगी प्रवासी बस विरोधात सातारा उपप्रदेशक परिवहन अधिकारी कार्यालया मार्फत विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसात मध्ये 27 खाजगी बसेस वर कारवाई करण्यात आले आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक विनापरवाना अथवा परवानाच्या अटींचा भंग करून वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर आणि बसेसवर आरटीओ यांच्यामार्फत चाप लावण्यात आला आहे.
त्याचबरोबर वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे केलेले बदल मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे. ज्यादा भाडे आकरणे अग्निशामक यंत्रणा आपत्कालीन दार आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत का अशा असंख्य तपासण्या करण्यास सुरूवात केली आहे. बेकायदेशीर वाहनांवर कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.