सातारा, सांगलीतील अनेकांना गंडा : लग्नाचे अमिष दाखवून लुबाडणाऱ्या पती- पत्नीला अटक

0
111
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इस्लामपूर | लग्नाचे आमिष दाखवून हजारो रुपयांचा गंडा घालणार्‍या सातारा येथील पती-पत्नीला इस्लामपूर पोलिसांनी सैदापूर येथून अटक केली आहे. अतुल धर्मराज जगताप (वय- 42) आणि श्वेता अतुल जगताप (वय -36, दोघे रा. सातारा) अशी अटक केलेल्या पती-पत्नींची नावे आहेत. या पती- पत्नींने आटपाडी, इस्लामपूर, सांगली परिसरात अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. नवरदेवाच्या घरच्यांकडून सोने, लग्नातील कपडे खरेदीसाठी हे दोघे ऑनलाईन पैसे मागवून घेत. पैसे घेतल्यानंतर श्वेता, अतुल परागंदा होत असे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ताकारी येथील युवकाला लग्नाचे आमिष दाखवून लग्नाच्या बस्त्यासाठी दि. 10 जुलै रोजी त्यांनी 30 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर संशयितांनी फोन बंद होता. दिलेला पत्ताही खोटा निघाला. त्यानंतर संबंधितांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात फिर्याद दिली होती. गतवर्षी संशयित अतुल आणि श्वेता यांनी रेठरेधरण येथील एकाला लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मणिमंगळसुत्रासाठी 33 हजार रुपये घेतले होते. त्या युवकाने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आटपाडी पोलिस ठाण्यातही या दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे.

बंटी- बबलीची आयडिया

संशयित अतुल आणि श्वेता हे दोघे बनावट नावाने लग्नासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात देत. जाहिरातीला प्रतिसाद मिळाल्यानंतर संबंधितांना ते सातार्‍यातील हॉटेलमध्ये बोलावून घ्यायचे. तेथेच मुलगी म्हणून श्वेता हिला उभे केले जायचे. अतुल हा मुलीचा भाऊ असल्याचे सांगायचा. मुलगी पसंत पडल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांबरोबर लग्नातील देण्या-घेण्यासंदर्भात बोलणी व्हायची. नंतर श्वेता, अतुल त्या मुलाशी किंवा त्याच्या घरच्यांशी संपर्क साधून मणीमंगळसूत्र, लग्नाच्या बस्त्यासाठी पैसे मागवून घ्यायचे. त्यासाठी ऑनलाईन अकाऊंट नंबर दिला जायचा. पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शरद बावडेकर, मीनाक्षी माळी यांच्या पथकाने शनिवारी सैदापूर येथे दोघांना ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here