सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्हयामध्ये पोलिसांच्यावतीने अनेक टोळींवर मोक्काची कारवाई केली जात आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका टोळीवर धडक कारवाई करण्यात आली असून टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या वतीने दोन्ही गुन्हेगारांच्या तडीपारीची आदेश देण्यात आले आहेत.
सराईत गुन्हेगार प्रल्हाद शिवाजी पवार (वय 23 वर्षे, रा. गोपाळवस्ती अजंठा चौक, सातारा ता. जि. सातारा), शिवाजी मल्हारी बुटे (वय 38 वर्षे, रा. अजंठा चौक, सातारा ता.जि. सातारा) (टोळी सदस्य) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. याबाबात अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यात जबरी चोरी, मोटार सायकल चोरी, चोरीची मालमत्ता बाळगणे असे दोन्ही गुन्हेगारांवर गुन्हे दाखल होते. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान निबाळकर यांनी या गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 5प्रमाणे सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावामध्ये यातील टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये दोन्ही आरोपींना अटक करुनही ते जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणाही झाली नाही. ते सातारा जिल्हयातील सर्वसामान्य लोकांच्या मोटार सायकल चोरी करुन इतर गुन्हे करीत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच बाक न राहिल्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई कण्याची मागणी होत होती. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्यावर दाखल असलेलया गुन्हयांची माहिती घेऊन मोटार सायकल चोरी तसेच इतर गुन्हे करणारा प्रत्हाद शिवाजी पवार व शिवाजी मल्हारी चुटे यांच्यावर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये सातारा जिल्हयातून दोन वर्षांकरीता उद्दपारीचा
आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर 2022 पासुन 5 उपद्रवी टोळ्यांमधील 13 इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोना प्रमोद सावंत, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो. कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.