हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून ही दुःखद बातमी दिली आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हंटल, मला माहिती आहे, मृत्यू हेच जगाचे अंतिम सत्य आहे! पण हे गोष्ट आपला जिगरी दोस्त सतीश कौशक यांच्या निधनबद्दल मी लिहिल, याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. ४५ वर्षांच्या मैत्रीवर असा अचानक पूर्णविराम!’. हरी ओम शांती. आता सतिश शिवाय आयुष्य पुन्हा पूर्वी सारखं राहणार नाही, असं ट्विट करत अनुपम खेर यांनी सतीश कौशिकयांच्या बद्दलच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली .
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔 pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
दरम्यान, सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. 1983 मधील जाने भी दो यारो या सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 100 हून अधिक सिनेमात काम केलं तसेच अनेक चित्रपटांमध्ये दिग्दर्शकाची भूमिकाही पार पाडली. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना, साजन चले ससुरालसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांनी रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है आणि तेरे नाम यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.