भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: जगातील टॉप मोस्ट कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या दिग्गजांची कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची नियुक्ती झाली आहे. ते 53 वर्षांचे आहेत. नाडेला यांच्या बढतीमुळे भारतीयांची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. 2014 पासून स्टीव्ह बामर यांच्यानंतर मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ म्हणून सत्या नाडेला जबाबदारी सांभाळत होते. आता त्यांची नियुक्ती मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन च्या अध्यक्षपदी झाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कंपनीचे माजी अध्यक्ष जॉन थॉमसन यांची प्रमुख स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. त्याच वेळी कंपनीने तिमाही लाभांश जाहीर केले असून ते प्रतिशेअर 56 सेट्स एवढे असतील तर 9 सप्टेंबर रोजी दिले जातील असेही कंपनीकडून सांगण्यात आलेआहे. 2014 मध्ये जॉन थॉम्पसन यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या कडून कंपनीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्याकडून हा पदभार सत्या नाडेला यांच्याकडे आला असून थॉमसन यांच्याकडे लीड इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, सत्या नाडेला यांचे व्यवसायाबद्दल सखोल ज्ञान योग्य धोरणात्मक संधी स्वीकारण्यासाठी आणि महत्त्वाच्या जोखीम ओळखण्यासाठी कंपनीला त्याचा उपयोग होईल. “

Leave a Comment