गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा 7 मतांनी पराभव; पाटणकरांनी मारली बाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्हा बँक निवडणूकीत शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कट्टर विरोधक असलेले सत्यजित पाटणकर यांनी त्यांचा 7 मतांनी पराभव केला. शंभुराज देसाई यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानल जात आहे.

शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा सात मतांनी पराभव झाला आहे. शंभूराज देसाई यांना एकूण 44 मते मिळाली तर सत्यजित पाटणकर याना तब्बल 58 मते मिळाली आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसलाही या निवडणुकीत धक्का बसला. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. शिंदेंविरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांचा विजय झाला आहे. शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना 25 मतं मिळाली आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का समजला जात आहे.

Satara DCC Bank Result : राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदेंचा अवघ्या 1 मताने पराभव; जावळीतून ज्ञानदेव रांजणे विजयी

भाजप -राष्ट्रवादीची गठ्ठी, उंडाळकरांची इठ्ठी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी

तुरुंगातून निवडणूक लढवून प्रभाकर घार्गेंनी मारली बाजी : राष्ट्रवादीला धक्का

सातारा जिल्हा बँक निवडणूक निकाल : मतमोजणीला सुरवात; काही वेळातच निकाल येणार हातात, पहा Live Updates

शशिकांत शिंदें यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांचे हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Leave a Comment