नाशिकमध्ये सत्यजित तांबेच निवडून येतील; अजितदादांच्या काँग्रेसला कानपिचक्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे हेच विजयी होतील असं म्हणत अजित पवारांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

खरं तर माझ्यासारख्या व्यक्तीने काँग्रेस या राष्ट्रीय पक्षावर बोलणं उचित नाही परंतु, एकेकाळी सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बरेच वर्ष काम करत होते. पक्षाचा जवळचा आणि बांधिलकी असलेला कार्यकर्ता म्हणून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली असती तर असं काही घडलंच नसत. नाईलाजास्तव त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. परंतु त्यांचे संपूर्ण घराणं काँग्रेसच्या विचाराचे आहे. माझा असा अंदाज आहे की नाशिकमध्ये सत्यजित तांबेच निवडून येतील आणि जिंकल्यानंतर ते योग्य निर्णय घेतील असं अजित पवारांनी म्हंटल.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानांतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं होत. तसेच त्याठिकाणी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील याना महाविकास आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिक मध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील असा थेट सामना पाहायला मिळाला. सध्या याठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. तांबे याना आत्तापर्यंत १४ हजाराहून अधिक मते मिळाली असून शुभांगी पाटील याना अवघी ७ हजार मते पडली आहेत.