हे क्रिकेटवरचे प्रेम नाही तर शुद्ध वेडेपणा; सत्यजित तांबे भडकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईतील मरीनड्राइव्ह पासून ते वानखेडे स्टेडियम पर्यंत क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या खेळाडूंना बघण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता. जग्गजेत्या खेळाडूंच्या स्वागतासाठी मुंबई अक्षरशः थांबली होती. यावेळी प्रचंड गर्दीत काहीजणांचा श्वास कोंडला तर अनेकजण एवढ्या मोठ्या गर्दीत जखमी सुद्धा झाले. या सर्व परिस्थितीवरून आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकांची हि गर्दी म्हणजे क्रिकेटवरचे प्रेम नाही तर शुद्ध वेडेपणा आहे असं म्हणत सत्यजित तांबे यांनी क्रिकेटप्रेमींना खडेबोल सुनावले आहेत.

याबाबत सत्यजित तांबे यांनी ट्विट करत म्हंटल, मुंबईला आणखी एक हाथरस बनण्यापासून वाचवल्याबद्दल देवाचे आभार. प्रशासन एवढा मोठा धोका कसा पत्करू शकते.हातरसमध्ये 121 लोकांचा जीव गेल्याच्या एका दिवसानंतर वानखेडे स्टेडियमवर “फर्स्ट कम, फर्स्ट सीट” येणाऱ्यास परवानगी दिली जात आहे? हे आपल्या देशावर किंवा क्रिकेटवरचे प्रेम नाही तर शुद्ध वेडेपणा आहे. अनागोंदी आणि बेपर्वाईपेक्षा सुरक्षितता आणि विवेकाला प्राधान्य देऊ या असं आवाहन सत्यजित तांबे यांनी केलं.

दरम्यान , मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत भारतीय संघाची ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात आली. आपल्या लाडक्या रोहित शर्मासह सर्व खेळाडूंना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमींचा जनसागर लोटला होता. मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा जयघोषाने संपूर्ण मुंबई दणाणून गेली. इतका विराट जनसागर पाहून भारतीय खेळाडूही हरखून गेले होते. क्रीडाचाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करताना सर्व खेळाडू उत्साहात दिसत होते. यानंतर वानखेडे स्टेडियमवर एका छोटेखानी कार्यक्रमात भारतीय खेळाडुंचा सन्मान करण्यात आला. विजयाचा आनंद साजरा करताना टीम इंडियाच्या खेळाडुंनी मैदानाला फेरी मारली. यावेळी ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित शर्मा स्वतावर आवर घालू शकला नाही. त्याने चांगलाच ठेका धरला आणि नाचायला सुरुवात केली. त्याच्यापाठोपाठ विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडूंनीही नाचायला सुरुवात केली. क्रिकेटप्रेमींना सर्वात जास्त आनंद देणार असं हे दृश्य होते