मुंबई | कोरोना च वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अभिनेते सौरभ शुक्ला यांच्यावर कोणी तरी अनेक मीम्स तयार केले असल्याचे दिसत आहे. हे मीम्स पाहून त्यांना खूप संताप आला आहे. त्यामुळे त्यांनी थेट पोलिसांत तक्रार केली आहे. अभिनेता सौरभ शुक्ला यांनी त्यांच्यावर व्हायरल झालेले मीम्स पाहून ट्विट केले आहे. तसेच ट्विटरवर त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.
https://twitter.com/saurabhshukla_s/status/1251809452174409728?ref_src=twsrc%5Etfw
ते म्हणतात की सध्याच्या परिस्थितीमध्ये असे मीम्स शेअर करणे चुकीची गोष्ट आहे. माझ्या या फोटोचा सोशल मीडियावर चुकीचा वापर केला जात आहे. मी फोटो पाहून हैराण झालो’ असे सौरभ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस यांना या ट्विटमध्ये टॅग केलं आहे, आणि पोलिसांत तक्रार ही दाखल केली आहे.
शुक्ला यांनी त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला १९८६मध्ये सुरुवात केली. ‘अ व्यू फ्रॉम द ब्रिज ‘लुक बॅक इन अँगर’ या नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.
खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक#coronavirus #coronaupdatesindia #HelloMaharashtrahttps://t.co/AmNrAG3QGs
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020