हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युनियन बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, या बँकेने आपल्या बचत खात्यावरील (Saving Account) उपलब्ध व्याजदरात बदल केला आहे. 1 जून 2022 पासून हे नवीन दर लागू होतील. यानंतर, बँकेच्या बचत खात्यातील 50 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर 2.75 टक्के व्याज मिळेल.
युनियन बँकेच्या 100 ते 500 कोटी रुपयांचे डिपॉझिट्स असलेल्या बचत खात्यांवर 3.10 टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी यावर 2.9 टक्के व्याज दिले जात होते. 1000 कोटी रुपयांपर्यंतच्या 500 कोटींहून जास्त बचत बँक डिपॉझिट्सवर, आता 2.9 टक्क्यांऐवजी 3.4 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, 1000 कोटींहून अधिकच्या डिपॉझिट्सवर आता 3.55 टक्के व्याजदर मिळेल, जो पूर्वी 2.9 टक्के होता.
‘या’ बँकेने देखील व्याजदरात केली वाढ
याशिवाय कोटक महिंद्रा बँकेने देखील 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदर वाढवला आहे. 6 मे 2022 पासून आता 5.2 टक्क्यांऐवजी 5.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. RBI च्या रेपो दरात वाढ करण्यामुळे बंधन बँक, आयसीआयसीआय बँक, जना स्मॉल फायनान्स बँक आणि फेडरल बँक इत्यादींनी देखील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे येत्या काही दिवसांत, प्रमुख बँकांकडून अल्प-मुदतीच्या डिपॉझिट्सवरील (Saving Account) व्याजदरात आणखी वाढ होऊ शकेल.