‘महाराष्ट्र कधी थांबलाय ना कधी थांबणार’ असं म्हणत पडळकरांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडून व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आजपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात असल्याचे बोललं जात आहे. अशात भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून एक अपेक्षा व्यक्त केली आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर काल मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पुढील 15 दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा लॉकडाऊनही गेल्या वेळेप्रमाणे लॉकडाऊनसारखाच कडक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच लोकडाऊन हा शेवटचा पर्याय ,हणून निवडतील आणि ते हि आजी संध्याकाळी, अस सांगितलं आहे.

उत्तरप्रदेश आणि आसाम राज्यांनी १८ वर्षावरील सर्वांसाठी मोफत लसीकरण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ‘महाराष्ट्र कधी थांबलाय ना कधी थांबणार’ याच भूमिकेतून आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी सुचवल्याप्रमाणे मा. मुख्यमंत्री ‘लॅाकडाऊन ‘ हा शेवटचा पर्याय म्हणूनच निवडतील आणि आज संध्याकाळी, असे म्हणत पडळकरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून अपेक्षा वर्तविली आहे.