एटीएम मधून पैसे काढून देतो म्हणत 73 हजारांना गंडवले

जालना | एटीएम मधून पैसे काढून देतो, असे म्हणत पाचशे रुपये काढून दिले. परंतु त्याच वेळी दुसरे एटीएमच्या नागरिकांच्या हातात देऊन नंतर एटीएम मधून 73 हजार 587 रुपये काढून घेत असल्याची फसवणूक केल्याची घटना जालना शहरातील कॉम्प्लेक्स भागातील एसबीआय एटीएम मध्ये घडली.

याप्रकरणी भानुदास गणपत जोशी सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, लक्ष्मीकांतनगर, जुना जालना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना जालन्यात वाढल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल साळवे करत आहेत.

You might also like