नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांना आज म्हणजेच 22 जानेवारीला गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. हे बँकेच्या सेवांच्या टेक्निकल अपग्रेडेशनमुळे होईल. 22 जानेवारीच्या रात्री 2 ते सकाळी 8.30 या वेळेत ग्राहकांना बँकेच्या ऑनलाइन सुविधा वापरता येणार नाहीत.
बँकेने ट्विट करून ही माहिती दिली आहे. SBI बँक इंटरनेट बँकिंग, YONO YONO Lite, YONO Business आणि UPI सर्व्हिस दुपारी 2 ते सकाळी 8:30 पर्यंत ग्राहकांना उपलब्ध होणार नाहीत.
ट्विटमध्ये म्हटले आहे, “आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी आमच्यासोबत राहावे कारण आम्ही एक उत्कृष्ट बँकिंगचा अनुभव देण्याचा प्रयत्न करतो.” बँकेच्या अधिकृत ट्विटर खात्यानुसार, SBI ग्राहक शनिवारी पहाटे इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, UPI सारख्या सर्व्हिस वापरू शकणार नाहीत.
SBI बँकेने बँकिंग सर्व्हिस सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेडेशन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या वर्षी 11 डिसेंबर रोजी एसबीआयच्या ऑनलाइन सेवाही 5 तासांसाठी बंद होत्या. बँकिंग सेवा आणखी चांगली आणि सुरक्षित करण्यासाठी ही सर्व्हिस अपग्रेड करण्यात येत असल्याचेही बँकेने तेव्हा सांगितले होते. 11 डिसेंबर रोजी SBI च्या ऑनलाइन बँकिंग सेवा, YONO app, YONO Lite, YONO Business, UPI सेवा 5 तासांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती.