हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या FD वरील व्याज दरात 25 bps ने वाढ केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) जास्त व्याज दरांसह एक नवीन स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स स्कीम जाहीर केली. ही योजना सामान्य श्रेणीतील गुंतवणूकदार तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असेल. मात्र, ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असेल जी पुढील महिन्यात बंद होईल.
SBI Amrit Kalash Deposit Scheme
घरगुती आणि अनिवासी भारतीय ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदर, 400 दिवसांचा कालावधी असलेली “अमृत कलश डिपॉझिट” लाँच केली आहे,” असे SBI ने ट्विट करत म्हंटले. चला तर मग या योजनेचेसवर माहिती जाणून घेउयात…
Introducing “Amrit Kalash Deposit” for domestic and NRI customers with attractive interest rates, 400 days tenure and much more.
*T&C Apply#SBI #Deposit #AzadiKaAmritMahotsav pic.twitter.com/mRjpW6mCvS— State Bank of India (@TheOfficialSBI) February 15, 2023
स्टेट बँक ऑफ इंडियाची ही नवीन 400 दिवसांच्या कालावधीची FD घरगुती आणि NRI अशा दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. जी 15 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत व्हॅलिड असेल.
या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के तर सर्वसामान्य नागरिकांना 7.1 टक्के व्याजदर दिला जाईल. तसेच हे व्याज याच्या मॅच्युरिटीवर दिले जाईल. तसेच यामध्ये इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार TDS देखील लागू असेल. या योजेची खास बाब अशी कि, या योजनेअंतर्गत ग्राहकांना मुदतपूर्व कर्जाची सुविधा देखील मिळेल.
स्टेट बँक ऑफ इंडियाने एफडीवरील व्याजदरात केली वाढ
स्टेट बँक ऑफ इंडियाने ठराविक कालावधीसाठी 2 कोटींपेक्षा कमी रिटेल देशांतर्गतफिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीचा व्याजदर 6.75 टक्क्यांवरून 6.80 टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे.
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीचा व्याजदर 6.75 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीचा व्याजदर 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीचा व्याजदर 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/deposits/fixed-deposit
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे नवीन भाव
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Infosys चा भारतीय वंशाच्या व्यक्ती अन् मुलं असलेल्या महिलांना कामावर घेण्यास नकार?
WhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या
Penny Stocks खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान