हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बँकेत केलेल्या व्यवहाराचा तपशील हा बँक स्टेटमेंटद्वारे आपल्याला मिळत असतो. पण त्यासाठी वेळ काढून आपल्याला बँकेत जावे लागते. कधी कधी स्टेटमेंट मिळवण्यासाठी लांबचलांब रांगेत उभे रहावे लागते जे खूपच कंटाळवाणे असते, पण जर तुम्ही SBI बँकेचे ग्राहक असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी माहिती देणार आहोत ज्याद्वारे एका फोन कॉल वर तुम्ही तुमच्या खात्यातील सर्व मिळवू शकता. तपशील मिळवू शकता पण त्याची नेमकी पद्धत काय आहे ? ती जाणून घेऊयात…
SBI ने आपल्या ट्विटर हॅन्डल वरून ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मोबाईलवर बँक स्टेटमेंट मिळवण्यासाठी तुम्हाला SBI कॉन्ट्रॅक्ट सेंटरला कॉल करावा लागेल. यासाठी तुम्ही १८०० १२३४ किंवा १८०० २१०० या कोणत्याही टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.
Request your account statement on a call. Dial SBI Contact Centre toll-free at 1800 1234 OR 1800 2100 and get your account statement on email.#SBI #AmritMahotsav #SBIContactCentre #TollFree pic.twitter.com/SllNIw7WQS
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 18, 2023
घरबसल्या बँक स्टेटमेंट मिळवण्यासाठी हे काम करा
१) सर्वप्रथम मोबाईल वरून १८०० १२३४ किंवा १८०० २१०० या कोणत्याही टोल फ्री क्रमांकावर कॉल करा.
२) त्यानंतर खात्यातील शिल्लक आणि व्यवहार डिटेल्स मिळविण्यासाठी क्रमांक 1 वर दाबा.
३) यानंतर तुमच्या बँक खात्यातील शेवटचे ४ क्रमांक टाका.
४) अकाउंट स्टेटमेंट मिळवण्यासाठी 2 दाबा. यानंतर,स्टेटमेंट कालावधी टाका
५) यानंतर काही क्षणात तुमच्या बँकेचा व्यवहाराचा तपशील तुम्ही निवडलेल्या अवधी नुसार तुमच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात येईल.