हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI कडून बुधवारी आपला बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) 70 बेस पॉईंट्सने वाढवून 14.85 टक्के आणि बेस रेट 70 बेस पॉईंट्सने वाढवून 10.10 टक्के केला गेला आहे. इथे हे लक्षात घ्या कि, बँकेकडून तिमाही आधारावर या दरामध्ये सुधारणा केली जाते.
SBI च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, या दरवाढीनंतर नवीन BPLR हा 6 सप्टेंबर 1996 नंतरचा उच्चांक आहे. त्यावेळी तो 15.50 टक्के होता. तसेच बेस रेट 10.10 टक्के होता. मात्र मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड आधारित कर्ज दरामध्ये (MCLR) कोणताही बदल झालेला नाही. गेल्याच महिन्यात बँकेने MCLR मध्येही 10 बेसिस पॉईंटने वाढ केली होती. ज्यानंतर ओव्हरनाइट MCLR 7.95 टक्के, एक वर्षाचा MCLR 8.50 टक्के आणि तीन वर्षांचा MCLR 8.70 टक्के झाला आहे.
RBI ने 2010 मध्ये बेस रेट आणला होता. बेस रेट हा किमान व्याजदर असतो ज्यावर बँका कर्ज देतात. एप्रिल 2016 मध्ये, RBI ने बेस रेट ऐवजी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड (MCLR) सादर केले. तसेच, नवीन कर्जे ही एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (EBLR) किंवा रेपो रेट लिंक्ड रेट (RLLR) च्या आधारावर दिली जातात. बेस रेट आणि बीपीएलआरमध्ये वाढ झाल्याने ज्यांचे कर्ज या बेंचमार्कशी जोडलेले आहे त्यांचा हप्ता वाढेल.
नोव्हेंबर 2022 मध्ये, SBI चे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले होते की,” बँकेच्या एकूण होम लोनपैकी 74 टक्के MCLR आणि EBLR शी जोडलेले आहेत. 21 टक्के कर्जे स्थिर दराची आहेत आणि उर्वरित (4 टक्के) कर्जे BPLR शी जोडलेली आहेत. डिसेंबरअखेर एसबीआयची एकूण प्रगती 17.6 टक्क्यांनी वाढून 31.33 लाख कोटी रुपये झाली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/benchmark-prime-lending-rate-historical-data
हे पण वाचा :
BSNL ने आणला जबरदस्त प्लॅन, 5 महिन्यांसाठी सर्व काही मोफत
फक्त विना तिकीट प्रवासच नाही तर ‘या’ चुकांसाठीही Railway कडून दिली जाते शिक्षा
देशभरात प्रवास करताना ‘या’ लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, पहा संपूर्ण लिस्ट
FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ 3 प्रमुख बँका एफडीवर देत आहेत जास्त व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर आज पुन्हा घसरले, तपासा आपल्या शहरातील आजचे दर