SBI ने सुरु केले नवीन बचत खाते, ज्यामध्ये जास्त व्याजसह उपलब्ध असतील अनेक सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपण देखील गुंतवणूकीची संधी (investment opportunity) शोधत असाल, जेथे कमी जोखीम आणि चांगले उत्पन्न असेल तर आपल्यासाठी आता एक चांगली बातमी आहे. आपण स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) चे SBI Saving Plus Account उघडू शकता. येथे आपल्याला कमी जोखीम बरोबरच अधिक व्याजही मिळेल. SBI च्या सेव्हिंग प्लस खात्यात बचत खात्यापेक्षा 2.7 टक्के अधिक व्याज मिळते.

जास्त व्याज कसे मिळवायचे ते जाणून घ्या
SBI च्या अधिकृत वेबसाइटनुसार सेव्हिंग प्लस खाते मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम (Multi Option Deposit Scheme – MODS) शी जोडले गेले आहे ज्यात बचत खात्याचे अतिरिक्त पैसे 1000 च्या मल्टीपलमध्ये टर्म डिपॉझिटमध्ये ट्रान्सफर केले जातात. टर्म पीरियड 1 ते पाच वर्षांपर्यंत असते. यासाठी तुम्हांला कमीत कमी शिल्लक राखणे आवश्यक आहे, यामध्ये ग्राहकांना बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळते.

हे खाते कोण उघडू शकते ते जाणून घ्या?
SBI Saving Plus Account व्हॅलिड KYC डॉक्यूमेंट असलेल्या कोणत्याही व्यक्तीद्वारे उघडता येऊ शकते. हे खाते सिंगल किंवा जॉईंट पद्धतीने उघडता येते.

जाणून घ्या, SBI Saving Plus Account चे फायदे ..
>> यामधील कालावधी 1 ते 5 वर्षे आहे.
>> ATM कार्ड मिळवा.
>> मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध आहे.
>> SMS अलर्ट येतो.
>> MOD वर कर्जही उपलब्ध आहे.
>> 1000 ते 10,000 रुपयांच्या मल्टीपलमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात.
>> 25 पेजचे चेकबुकही उपलब्ध आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment