नवी दिल्ली । तुम्ही आरोग्य आणि तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देत असाल तर SBI कार्डने तुमच्यासाठी एक खास क्रेडिट कार्ड SBI Card PULSE लाँच केले आहे. क्रेडिट कार्ड क्षेत्रातील एक प्रमुख प्लेयर असलेले SBI कार्डला असा विश्वास आहे की, ते आरोग्य आणि फिटनेस जागरूक कार्डधारकांच्या गरजा पूर्ण करेल.
हे कार्ड व्हिसा प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आले आहे. याचा अर्थ व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व मर्चंट आउटलेट किंवा ऑनलाइन साइटवर कार्ड वापरले जाऊ शकते.
हे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड 1,499 रुपयांच्या वार्षिक मेम्बरशिप फीसह येते. मात्र, या कार्डद्वारे वर्षभरात 2 लाख रुपये खर्च केल्यास रिन्यूअल फी माफ केली जाईल. जॉइनिंग फी भरल्यानंतर कार्डधारकांना वेलकम बेनिफिट म्हणून ‘Noise ColorFit Pulse Smartwatch’ मिळते. या स्मार्टवॉचची किंमत 4,999 रुपये आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.4 इंच फुल कलर डिस्प्ले, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग (SPO2), स्लीप मॉनिटरिंग यांसारखी अनेक उत्तम फीचर्स आहेत.
ग्राहकांना आणखी काय मिळणार?
SBI कार्ड पल्स ग्राहकांना एक वर्षासाठी मोफत Fitpass Pro मेम्बरशिप मिळते. या अंतर्गत, ग्राहकांना देशातील 4,000 हून अधिक जिम आणि फिटनेस स्टुडिओच्या नेटवर्कमध्ये एक्सेस मिळेल. याशिवाय कार्डधारकांना नेटमेड्स फर्स्टची एक वर्षाची मोफत मेम्बरशिप देखील दिली जात आहे.
रिवॉर्ड पॉइंट्सही मिळतील का?
जेव्हा ग्राहक पल्स कार्डद्वारे फार्मसी, औषधाची दुकाने, डायनिंग आणि चित्रपटांसाठी खर्च करतात तेव्हा ते 5X रिवॉर्ड पॉइंट्स मिळवू शकतात. याशिवाय, एका वर्षात 4 लाख रुपये खर्च केल्यावर, कार्डधारकांना Netmeds वर 1,500 रुपयांचे ई-व्हाउचर दिले जाईल.