SBI च्या ‘या’ क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल, जाणून घ्या रिवॉर्ड पॉइंट्सबाबतचे नवीन नियम

SBI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : आता नवीन वर्ष सुरू झाले आहे. मात्र याबरोबरच अनेक मोठे आर्थिक बदल देखील दिसून येत आहेत. जर आपण SBI SimplyCLICK चे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरेल. कारण, स्टेट बँक ऑफ इंडियाची कार्ड आणि पेमेंट सर्व्हिस शाखा असलेल्या SBI कार्डकडून SimplyClick कार्डधारकांसाठीच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत.

SBI SimplyCLICK Credit Card Review | CardInfo

हे लक्षात घ्या कि, 6 जानेवारी 2023 पासून हे बदल लागू होतील. व्हाउचर आणि रिवॉर्ड पॉइंट्सच्या पूर्ततेशी संबंधित हे नवीन नियम आहेत. आता ज्या SimplyClick कार्डधारकांना क्लियरट्रिप व्हाउचर जारी केले गेले आहे यापुढे त्यांना ते एकाच ट्रान्सझॅक्शनमध्ये रिडीम करावे लागतील. हे लक्षात घ्या की, SimplyClick कार्डधारकांना या क्रेडिट कार्डद्वारे खर्चाचा एक विशिष्ट टप्पा गाठल्यानंतर क्लियरट्रिप व्हाउचर दिले जातात.

SBI SimplyClick Credit Card: Review, Benefits - E-Apply | Card Insider

Amazon वरील खर्चावर मिळतील 5X रिवॉर्ड पॉइंट्स

याशिवाय, Amazon.in वर SimplyClick/SimplyClick Advantage SBI कार्डच्या ऑनलाइन खर्चावरील रिवॉर्ड पॉइंट्सच्या नियमातही बदल केले आहेत. या नवीन नियमानुसार, आता 1 जानेवारी 2023 पासून, या कार्डद्वारे Amazon.in वर केलेल्या खर्चावर 10X रिवॉर्ड पॉइंट्सऐवजी 5X रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. मात्र, या कार्डद्वारे Apollo24X7, BookMyShow, Cleartrip, Eazydiner, Lenskart आणि Netmeds वरील खर्चावर 10X रिवॉर्ड पॉइंट्स मिळतच राहतील.

SBI SimplyCLICK Credit Card Review - Card Maven

माइल स्टोन बेनिफिट

>> कार्डद्वारे वर्षभरामध्ये 2 लाख खर्च केल्यावर क्लियरट्रिपचे 2000 ई-व्हाऊचर उपलब्ध.
>> कार्डद्वारे वर्षभरामध्ये 1 लाख खर्च केल्यावर क्लियरट्रिपचे 2000 ई-व्हाऊचर उपलब्ध.

कार्डसाठीचे शुल्क

>> या कार्डसाठीची एन्यूअल फी (वन टाइम) 499 रुपये आहे.
>> या कार्डसाठीची रिन्यूअल फी 499 रुपये आहे. मात्र, वर्षभरात एक लाख रुपये खर्च केल्यानंतर रिन्यूअल फी रिव्हर्स केली जाईल. SBI

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.sbicard.com/en/personal/credit-cards/shopping/simplyclick-sbi-card.page

हे पण वाचा :
‘या’ Penny Stock ने गेल्या 1 वर्षातच गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये
Business Idea : घरबसल्या ‘हे’ व्यवसाय करून मिळवा हजारो रुपये
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या