नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI (State Bank Of India) ने घर खरेदीदारांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने आपल्या होम लोन वरील व्याज दरात वाढ केली आहे. म्हणजेच घर खरेदी केल्यावर आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त EMI द्यावा लागेल. आता बँकेचे नवीन व्याज दर 6.95 टक्के झाले आहेत. त्याचबरोबर बँक 31 मार्चपर्यंत 6.70 टक्के व्याजदराने होम लोन देत होते.
SBI ने 6.70 टक्के व्याजदराने मर्यादित कालावधीसाठी 75 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनची ऑफर दिली होती. त्याचवेळी 75 लाख ते पाच कोटी रुपयांच्या होम लोनवरील व्याज दर 6.75 टक्के होते.
अन्य बँका देखील व्याज दरात वाढ करू शकतात
SBI च्या वेबसाइटनुसार, 1 एप्रिलपासून 6.95 टक्के व्याज दर लागू झाला आहे. हा नवीन दर मर्यादित मुदतीच्या ऑफरपेक्षा 0.25 किमान पॉईंटने जास्त आहेत. SBI ने होम लोनवरील किमान व्याज दर वाढवल्यानंतर आता इतर बँकासुद्धा अशीच पावले उचलू शकतात.
प्रोसेसिंग फी किती असेल
होम लोनवर बँकेने प्रोसेसिंग फी देखील आकारली आहे. हे कर्जाच्या रकमेच्या 0.40 टक्के आणि वस्तू व सेवा कर (GST) च्या रूपात असेल. याशिवाय प्रोसेसिंग फी किमान 10,000 आणि जास्तीत जास्त 30,000 रुपये (GST) असेल. गेल्या महिन्यात एसबीआयने 31 मार्चपर्यंत होम लोनवरील प्रोसेसिंग फी माफ करण्याची घोषणा केली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा